नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान

4kNews कामोठे दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) : दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी, विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लुइझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने दिव्यांग क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा सन्मान देण्यात आला. 



विशेष म्हणजे, साईनाथ पवार हे स्वतः दिव्यांग असूनही त्यांनी शारीरिक मर्यादांवर मात करत अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे. दिव्यांगांना मार्गदर्शन, शैक्षणिक संधी आणि प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले आहे.



याच सामाजिक कार्याची दखल घेत भारतीय अवॉर्ड कौन्सिलच्या वतीने त्यांना पुणे येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या दुहेरी सन्मानाबद्दल दिव्यांग बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top