नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक

4kNews कामोठे दि. 5

पनवेल (प्रतिनिधी) : दिवाळीनिमित्त केदार भगत यांच्यातर्फे नागरिकांना सुवासिक उटण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदा उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.



या उपक्रमाचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व ओळखून जलसंरक्षणाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात; मात्र निसर्गनिर्मित पाण्याचा अमूल्य ठेवा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



यावेळी नगरसेवक हैप्पी सिंग, विशाल सावंत, प्रतीक बहिरा, ब्रिजेश बहिरा, चेतन डुकरे, शेषनाथ गायकर, भावेश शिंदे आणि विजय बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते. रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांना या सामाजिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top