नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

कामोठे येथे ‘महारक्तदान संकल्प 2025’ उपक्रम यशस्वीपणे पार पडला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर


कामोठे (4K News प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून कामोठे येथे “महारक्तदान संकल्प 2025” या भव्य उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले.


“रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली भाजप कामोठे शहर मंडळ यांच्या वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालय, सेक्टर ३६ येथे रक्तदान शिबिर पार पडले.
या उपक्रमासाठी कामोठे भाजपा मंडळाचे अध्यक्ष श्री विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रवी गोवारी यांचे विशेष सहकार्य लाभले. याशिवाय माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, माजी अध्यक्ष रविशेठ जोशी, रवींद्र म्हात्रे, समाजसेवक, प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, श्री . रमेश तुपे,  हरजिंदर कौर, जयकुमार डिगोळे, सुरेश खरात, अल्पेश माने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजप्रती आपली बांधिलकी आणि संवेदनशीलता दाखवून दिली.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन हे भाजप कार्यकर्त्यांच्या संघटीत प्रयत्नांचे फलित असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी कामोठे शहर भाजप मंडळाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि अशा सामाजिक उपक्रमांनीच जनतेशी जोडलेपण अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. 


कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक आगळावेगळं, जीवनदायी व प्रेरणादायी वाढदिवस साजरा करून दिला. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून लोकसहभागाचे उदाहरण या शिबिरात पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top