पनवेल, दि. २३ (४K प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २७ डिसेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार, आज दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यातील टिळक यांचे योगदान आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या ऐतिहासिक घोषणेच्या आठवणींनी परिसर भारावून गेला. कार्यक्रमाचे आयोजन (गजानन घाडगे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
