4k समाचार दि. 20
मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहण्याची तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, धोकादायक भाग टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

दरवर्षीप्रमाणे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे
