4k समाचार दि. 20
पनवेल शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा परिणाम वन्यजीवांवरही झाला असून, बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांचे दर्शन वाढले आहे.
विशेषतः सीबीडी बेलापूर परिसरात दोन दिवसांत तब्बल आठ सापांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये विषारी सापांच्या पिलांचाही समावेश आहे. पुनर्वसु सर्पमित्र संस्थेचे सर्पमित्र अष्टविनायक मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई करून सापांना जीवदान दिले.

दरम्यान, पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्रांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
