दी. 18
पनवेल (4K News)कामोठे परिसरात रस्त्यावर व झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अस्वच्छ वातावरण, सुरक्षित निवारा व वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे या मुलांना आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रतिष्ठानने पनवेल महानगरपालिकेकडे आरोग्य शिबिर घेण्याची मागणी केली होती.

दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रतिष्ठानचे प्रमुख सागर दिलीप पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत ही मागणी केली होती. पत्रात कुपोषण, संसर्गजन्य आजार आणि स्वच्छतेअभावी उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न टाळण्यासाठी या मुलांची नियमित आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आले होते..

या मागणीला प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी कामोठ्यात आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल असे आश्वासन दिले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद भोईटे देखील उपस्थित होते.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. गीतेश दरेकर व यश चिले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणारे हे शिबिर कामोठ्यातील गरजू व वंचित घटकांना मोठा दिलासा देणार आहे. सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचे म्हणणे आहे की – “समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”
