पनवेल, दि.18 (4kNews) ः परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा होणे व संविधानाच्या प्रतिची विटंबना करणार्या माथेफिरुंवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह निलेश कांबळे, चंद्रकांत वेळास्कर, मनोज कांबळे, आसिफ शेख, समाधान कांबळे, अमित वाघमारे, रवींद्र गायकवाड, भारत दातार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश साळुंखे यांनी सांगितले की, परभणी ज्या समाज कंटकांनी संविधानाच्या प्रतेची विटंबना केली

त्या माथेफिरुवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी त्याचप्रमाणे निषेध आंदोलनात सहभागी असलेले दिवंगत धम्म बांधव सोमनाथ सुर्यवंशी यांच्यावर पोलीस कोठडीत पोलिसांद्वारे अमानुष अत्याचार करण्यात आला असल्याचे समजते त्या अत्याचारामुळे त्यांची हृदयक्रिया बंद पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित जबाबदार पोलीस अधिकार्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी पक्षाच्या वतीने केली आहे.
