पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पदी प्रसाद भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड पनवेल विधानसभा-188 मधील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद भोईर यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व आपआपसातील मतभेद विसरुन पक्षवाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी प्रसाद भोईर यांनी केले.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, महानगर संघटिका सौ. लिना गरड, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, उपतालुका संघटिका सौ. तनुजा झुरे, पनवेल शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, कामोठे शहर संघटिका सौ. संगीता राऊत, खारघर शहर संघटिका सौ. संपदा धोंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
