पनवेल, दि.27 (संजय कदम) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे फक्त महिलांसाठी खास भरती मोहिम घेण्यात आली आहे.
रसायनीमधील एका नामांकित कंपनीमध्ये पॅकेजिंग विभागासाठी महिलांची भरती सुरू आहे.

यासाठी गरजू महिलांसाठी एक विशेष कॅम्पचे आयोजन शुकवार दि.30 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिवसेना पनवेल शहर शाखा लाईन आळी येथे करण्यात आले असून यासाठी किमान पात्रता आठवी पास आवश्यक आहे.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव 9082243901, शिवसेना शहर संघटीका सौ.अर्चना कुळकर्णी 7045386753, उपशहर संघटीका सौ.उज्वला गावडे 8108655629 व विभाग संघटीका सौ.रेश्मा कुरुप 7021995279 यांनी केले आहे.
