पनवेल, दि.27 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.29 मे 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता पनवेल शहर पोलीस ठाणे येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष रो.शैलेश पोटे, मेडीकल डायरेक्टर रो.डॉ.लक्ष्मण आवटे व सचिव रो.दिपक गडगे यांनी केले आहे.
