कामोठे (4K News) परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अँड श्री समाधान काशीद आणि मित्र परिवार यांच्या वतीने एक वेगळं व उपयुक्त पाऊल उचलण्यात आलं आहे.
२० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत मोफत आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
घराघरात आधार कार्डाच्या तांत्रिक अडचणी, वृद्धांसाठी लाईफ सर्टिफिकेट, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना – अशा अनेक गरजा असतात. या शिबिरातून त्या सर्व प्रश्नांचं समाधान होणार आहे.
लहानग्यांसाठी (०-५ वर्षे) विनामूल्य नवीन आधार कार्ड
लाईफ सर्टिफिकेट योजना – ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा
सुकन्या समृद्धी योजना – आपल्या मुलींच्या भविष्याची सुरक्षितता
रेशनिंग कार्ड E-KYC आणि इतर पोस्ट ऑफिस योजनांबाबत मार्गदर्शन
हा उपक्रम म्हणजे केवळ योजना नाही, तर समाजासाठी असलेली खरी जबाबदारी आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, आधार कार्डासारख्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीसाठी धावपळ होऊ नये, यासाठीच हे शिबीर घेण्यात आलं आहे.
📍 ठिकाण – शॉप नं. १, एकदंत को ओप सोसायटी, प्लॉट नं. १९, सेक्टर २२, कामोठे
नागरिकांना आवाहन करताना अँड श्री समाधान काशीद म्हणाले – “आपल्या छोट्या प्रयत्नातून समाजाच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसली, तर त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काही असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या शिबिराचा लाभ घ्यावा.”

