पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी […]
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
महिलांच्या आत्मविश्वासासाठी कामोठ्यात नवा उपक्रम…
कामोठे (4K News) समाजात महिलांनीही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजीत संवाद साधावा, मुलाखतीत आपली छाप पाडावी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे बोलावे, या उद्देशाने सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कामोठ्यातील मुली आणि महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सद्वारे केवळ भाषा शिकवली जाणार नाही, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि […]
सुकन्या’च्या भविष्यासाठी, ‘ज्येष्ठांच्या’ सुरक्षिततेसाठी – ऍड समाधान काशिद यांचा समाजासाठी उपयुक्त उपक्रम
कामोठे (4K News) परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी अँड श्री समाधान काशीद आणि मित्र परिवार यांच्या वतीने एक वेगळं व उपयुक्त पाऊल उचलण्यात आलं आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत मोफत आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.घराघरात आधार कार्डाच्या तांत्रिक अडचणी, वृद्धांसाठी लाईफ सर्टिफिकेट, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना – […]
भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे
काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]
रस्ते, लाईट, आरोग्यसेवा – कामोठेकर त्रस्त, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पालिकेला इशारा
पनवेल :सप्टेंबर 9 (4K समाचार)कामोठे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सोयीसुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे आज पनवेल महानगरपालिकेत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले. या मागणीपत्रात नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यांच्याशी संबंधित अनेक तातडीच्या विषयांचा समावेश आहे. 📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : कामोठे सेक्टर २१ येथील चौकाचे नामकरण “लोकनेते […]
रूमच्या आमिषाने साडेअठरा लाखांची फसवणूक
4k समाचार दि. 21 पनवेल | करंजाडे परिसरात रूम देतो असे सांगून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कैलासचंद्र प्रजापती यांच्याकडून आरोपी केतन भानुशाली व एजंट मुकेशसिंग यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून […]
कामोठे परिसरात बनावट सरकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी दिला इशारा
कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]
*श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था यांच्या मार्फत करंजाडे नगरीत आयोजित कार्यक्रम पाच महान संतांच्या पादुका दर्शन सोहळ्याचा अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न!*
*करंजाडे:* रविवार, २५ मे २०२५ रोजी करंजाडे नगरीत इतिहासात पहिल्यांदाच पाच महान संतांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साहात पार पडला. सेक्टर ४ येथील खुल्या मैदानात आयोजित या सोहळ्याने करंजाडे नगरी खऱ्या अर्थाने पावन झाली आणि आध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली. श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था करंजाडे यांच्या अथक प्रयत्नांतून हा भव्य सोहळा […]
*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*
आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे, या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क […]