
बँकेचे अॅप डाऊनलोड केल्यास सर्व्हिस कर कमी लागेल असे खोटे सांगून क्रेडिट कार्डवरून अनधिकृत व्यवहार करून एक लाख ६४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमोल गुरव हे कामोठे, सेक्टर सहा येथे राहत असून २० नोव्हेंबर रोजी त्यांना एक फोन आला आणि बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असून, क्रेडिट कार्डवर जास्त सर्व्हिस कर आकारण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी अमोल यांनी अॅप डाऊनलोड केल्यावर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून अनधिकृत व्यवहार झाले.
