रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक बसली. या अपघातात कारचालक याचा मृत्यू तर चौघे जखमी झाले. आकाश गणपत माढा (वय २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे

. हा अपघात सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे पहाटे झाला. याप्रकरणी कळंबोली पोलिसानी रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रेलर उभा करून ठेवणारा चालक हरिप्रसाद शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग चौधरी (वय २६), रोहन चौधरी (वय २४), हर्षिद झा (वय २१, सर्व रा. खारघर) हे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
