नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची शेतकर्‍याची मागणी


(4kNews कोमोठे ) ः पनवेल तालुक्यातील मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची आज मागणी पनवेल शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात घेतलेल्या 11 व्या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेले शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी केली आहे. 


यावेळी बोलताना फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी सांगितले की, सदर जमीन फसवणूक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल (आकारफोड पत्रकात) भु.अ.का.पनवेलच्या अधिकारी वर्गाने तसेच तत्कालीन तहसील कार्यालयातील पदाधिकारी व मंडळ अधिकार्‍यांनी पाठविलेल्या खोट्या तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने तसेच जमीन विकत घेणार्‍याने बाहेरुन आणलेल्या चुकीच्या लेखी पुरसिसच्या अनुषंगाने केलेली आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून माझा तसेच माझ्या काकांचा व त्यांच्या मुलांची फसवणूक झाली असल्याचे गोंधळी यांचे म्हणणे आहे. तरी याबाबत शासनाने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्याांनी आज केली आहे. याबाबत अनिल ढवळे व अ‍ॅड.शेळके यांनी सुद्धा या संदर्भात आम्ही फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गेांधळी यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top