नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला मिळाली परत


पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला पोलिसांनी परत मिळवून दिली आहे.


वत्सला राम पकडे (रा. घोट गाव) या खरेदी करता घोट गाव ते पनवेल भाजी मार्केट असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील अन्य चार महिला असे रिक्षामध्ये बसून महाराष्ट्र बँक, ओल्ड पनवेल समोर उतरल्या होत्या. सदर वेळी त्यांच्याकडे असलेली बाजारा करता आणलेली पिशवी ही सदर रिक्षामध्ये त्या विसरून खरेदी करता पनवेल बाजारपेठ येथे आले असता त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या बरोबर असलेली पिशवी ही सदर रिक्षामध्ये विसरून राहिली होती.

सदर पिशवीमध्ये त्यांचे कानातील 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याची साखळ्या होत्या सदर महिला पनवेल शहर पोलीस ठाणे येथे त्यांची पिशवी रिक्षात विसरल्याची तक्रार देण्याकरता आल्या असता वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पो ना मिथुन भोसले, पोशि कराड, पोशि विशाल दुधे यांना सदर बाबत माहिती देऊन महाराष्ट्र बँक ओल्ड पनवेल येथील सीसीटीव्ही तपासण्याकरता सांगितले असता

त्यांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून त्या आधारे त्यांनी सदरची रिक्षा क्रमांक एमएच-46-एझेड-8370 ही रिक्षा ट्रेस करून त्या रिक्षाचे डिटेल्स घेऊन त्याद्वारे रिक्षा चालक नावे अनिकेत दुबे यांचा संपर्क क्रमांक मिळवून सदर संपर्क क्रमांकावर अनिकेत दुबे याला संपर्क करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता त्यांनी त्यांची रिक्षा तपासून सदर रिक्षात वत्सला पगडे यांची पिशवी असल्याचे आढळून आल्याने तो पनवेल शहर पोलीस ठाणे येथे हजर झाल्याने सदरची पिशवी व वत्सला पगडे यांच्या कानातील सोन्याच्या साखळ्या पोलीस उपनिरीक्षक वायकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. यावेळी वत्सला पगडे यांनी पोलिसांचे आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top