नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

तीन इसमांकडून दोन लोंखडी अग्निशस्त्र ( पिस्टल ) व एक जिवंत काडतुस हस्तगत केले नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ; 1 आरोपी फरार


पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील नेरे परिसरातून नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन इसमांकडून दोन लोखंडी अग्नीशस्त्र (पिस्टल) व एक जीवंत काडतुस हस्तगत केले असून त्यांचा चौथा साथीदार पसार झाला आहे.


अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना त्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत, संशयीत इसम हे हॉटेल न्यु रॉयल कॅफे अन्ड कॅटर्स व नेरे मटण शॉप व चिकन सेंन्टर, नेरे, येथिल कॉर्नरवर वाजेकडे जाणार्‍या रोडवर चार इसम कार मधुन तसेच मोटार सायकल वरून दोन अग्निशस्त्र (पिस्टल) 7,00,000/- लाख रूपये मध्ये विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई व सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अलका पाटील, पोहवा मांडोळे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि कोलते तसेच पोशि शिंदे आदींच्या पथकाने सपोनिअलका पाटील यांची टिम तयार करण्यात आली.

त्यानंतर हॉटेल न्यु रॉयल कॅफे अँन्ड कॅटर्स व नेरे मटण शॉप व चिकन सेन्टर, नेरे, येथिल कॉर्नरवर वाजेकडे जाणार्‍या रोडवर सापळा लावुन बनावट ग्राहकाच्या इशार्‍यावर कारवाई केली असता पांढ-या रंगाच्या मारूती स्वीपट कार क एमएच 12 केजे 1623 मध्ये तीन इसम त्यामध्ये किशोर दत्ता धाडी, (वय 24, रा.बोनशेत, नेरे), ॠषीकेश रघुनाथ लोटे (27 रा.वलप), यशवंत बबन सत्रे (वय 24 वर्ष, रा.वलप) यांना सापळा रचून ताब्यात घेतले असता त्यांच्या ताव्यातुन 1,20,000/- रूपये किंमतीच्या दोन लोंखडी अग्निशस्त्र ( पिस्टल ) तसेच एक जिवंत काडतुस मिळुन आल्यावरून ते जप्त करण्यात आले.

कारवाई दरम्यान यामाहा कंपनीची एमटी मोटार सायकल एमएच 07 ईआर 1993 वर बसुन असलेला इसम त्यांचा साथीदार हा पाच जिवंत काडतुस घेवुन मोटार सायकल सोडुन पळुन गेला आहे. दरम्यान आरोपी यांनी गुन्हयात वापरलेली कार व मोटार सायकल पोलीसांनी जप्त केली असुन चारही इसमा विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 3, 27 सह बीएनएसक 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी यांच्याकडे मिळुन आलेले पिस्टल त्यांनी कोणाकडुन प्राप्त केले आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पनेवल तालुका पोलीस ठाणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top