पनवेल, दि.15 (4kNews) ः परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी करंजाडे शहर च्या वतीने आज पनवेल शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

यावेळी पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा कु. रोहिणीताई खरात, आयु. स्वप्नील पवार (अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी करंजाडे शहर) आयु. नितीन कांबळे (अध्यक्ष -वंचित बहुजन आघाडी करंजाडे विभागीय) आयु. आयु. गौतम अहिरे , आयु.बापू सावंत , आयु. दिगंबर साळवे, आयु. धनंजय ताटे, आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
