पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआऊट केल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 चे प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागचे अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन परिसर या भागामध्ये कोंबींग आपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

यामध्ये एनडीपीएस सेवन अंतर्गत एकावर कारवाई, बेकायदेशीररित्या दारु विक्री संदर्भात तीघांवर कारवाई, मोटार वाहन कायदा मोडणार्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवशंभू नाका येथे नाकाबंदी दरम्यान 79 वाहने चेक करण्यात आली असून एकुण 27 वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

तसेच नवनाथ नगर झोपडपट्टी व रेल्वे स्टेशन परिसर येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून सदर ठिकाणी परकीय नागरिक अथवा बांगलादेशी नागरिक यांचा शोध घेण्यात आला. हॉटेल, लॉज तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान 08 सपोनि/पोउपनि , 21 अमलदार, आरसीपी पथक असे सहभागी झाले होते.
