नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन


पनवेल, दि.15 (संजय कदम) ः नेहरू सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने ओरियन मॉल, पनवेल येथे 25 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात भेट देण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी आवाहन ओरियन मॉलच्या वतीने मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे.


हे विशेष प्रदर्शनी विज्ञान शिक्षणामध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे विज्ञानाच्या मनोरंजक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरणाचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे. नेहरू सायन्स सेंटर दीर्घकाळापासून प्रत्यक्ष प्रयोग, संवादात्मक मॉडेल्स आणि कार्यशाळांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज व प्रभावी पद्धतीने पोहोचवत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी थरारक लाइव्ह प्रयोग व सहभागी होण्याची संधी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा आहे.

त्याचप्रमाणे विज्ञान समजून घेण्यास मदत करणार्‍या नवकल्पनांचा अनुभव येथे मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीला अर्थपूर्ण बनवेल आणि त्यांच्यात विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी दीर्घकालीन रुची निर्माण करेल. तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top