4k समाचार
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, आणि आपले मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल किती वापरावा. आई-वडिलांबरोबर संवाद कसा साधावा, किती वेळ साधावा, शिक्षकांबरोबर चर्चा संवाद कसा करावा मित्रांमध्ये संवाद कसा असावा मोबाईल वापरला नाही तर काय फायदे होतील. मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा, व्यक्तिमत्व विकास कसे घडवावे, रोजगाराच्या संधी कशा मिळव्यात, ज्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवायच्या नसतील तर व्यवसाय कसा निवडावा या सर्व विविध घटकांविषयी अतिशय उद्बोधक अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्ही एस इंदुलकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले व्यवसाय कसे निवडावे त्यासाठी करिअर कट्टा कसा आपणास उपयोगी ठरू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी विद्यार्थ्यांना सुरेख असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थी कसा असावा विद्यार्थ्यांनी रोजगार व्यवसाय निवडताना कोणती काळजी घ्यावी. आपल्या आई-वडिलांचे गुरुजनांचे संस्कार आपल्या आचरणात आणावेत. करिअर कट्टाचा भरपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षणाबरोबर इतर कोर्सेस, जागतिक भाषा, व्यवसाय निवड यांचे तंत्र आत्मसात करावीत आणि आपण बेरोजगार मुक्त राहावं आणि देशाची सेवा करावी. त्यानंतर करिअर संसदची मुख्यमंत्री कु. प्राप्ती संतोष पांगुळ या विद्यार्थिनीने मान्यवरांचे आणि सर्व उपस्थित यांचे आभार मानले. डॉ. डी पी हिंगमिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जगताप एच के यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सदर कार्यक्रमाला डॉ. पी आर कारुळकर डॉ. अरुण चव्हाण डॉ. एम जी लोणे डॉ. अनुपमा कांबळे प्रा. थावरे प्रा. रियाज पठाण प्रा. हन्नत शेख प्रा. विनिता तांडेल तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
