नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजणार

4kNews.
पनवेल दि.22 (वार्ताहर): नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजताना दिसणार असल्याने अनेक फार्महाऊसमध्ये  सर्व शासकीय नियमांचे पालन करीत जय्य्त तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. 


  यावर्षी वर्ष अखेर ३१ डिसेंबरला असून या दिवशी बुधवार आहे. त्यामुळे विविध परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पनवेल परिसरात मोठी गर्दी करणार व आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी बुधवार असल्यामुळे पिणाऱ्यांची मोठी चंगळ होणार आहे. हजारो कोंबड्या, कोंबडे, बकरे यांची , कत्तल होणार आहे. यावर्षी पाऊस जवळजवळ सहा महिने सातत्याने पडत होता. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून वालाच्या शेंगाचा बहर उशिराने येणार आहे. त्या दिवशी पोपटीची चंव फार थोड्या प्रमाणावर मिळणार आहे. गावठी कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कोंबडीची किंमत रु ४०० ते ५०० तसेच कोंबड्याची किंमत रु ८०० आणि त्यापुढे आहे. गावठी कोंबडा कोंबडीच्या शोधामध्ये अनेक जण आताच फिरू लागले आहेत. 

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाउस असून त्यामध्ये प्रामुख्यांने राज रिसॉर्ट, छाया रिसॉर्ट, एम. जे. रिसॉर्ट, एस, आर रिसॉर्ट, विसावा रिसॉर्ट, रियाण फार्महाउस आदी फार्महाऊसमध्ये दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. या वर्षीसुद्धा मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरातील नागरिकांनी पनवेल परिसरात असलेल्या फार्महाऊसमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे योजिले असल्याने पूर्वीपासून त्यांनी येथे बुकींग करून ठेवली आहे. फार्महाउस वाल्यांनी सुद्धा सर्वसामान्यांना परवडेल असे दर ठेवले आहेत. त्यामुळे हे फार्महाउस हाऊसफुल्ल  झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top