नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

2030 पर्यंत 500 दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता –  जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा


जागतिक श्रवण दिनानिमित्त खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलने केली बहिरेपणा आणि कॉक्लियर इम्प्लांटसंबंधी जनजागृती
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः दरवर्षी जगभरात जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने मेडिकवर हॉस्पिटलने लहान मुलांमधील बहिरेपणा आणि कॉक्लियर इम्प्लांटवर जनजागृती करणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलांमधील श्रवण क्षमता कमी होण्याच्या वाढत्या घटनांमुळे, या कार्यक्रमात श्रवण क्षमता कमी होण्याच्या घटना रोखण्यासाठी वेळेवर उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. याठिकाणी आयोजित उपक्रमात नवी मुंबई- इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्सच्या अध्यक्षा डॉ. मंगाई सिन्हा यांच्यासह इतर ऑडिओलॉजिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि रोटरी सदस्य असे सुमारे 50 व्यक्तींन सहभाग नोंदविला. त्यांच्याकरिता याठिकाणी शैक्षणिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांमधील श्रवणक्षमता कमी होणे, त्याचे परिणाम आणि प्रगत उपचार पर्यायांबद्दल त्यांना शिक्षित करणे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश होता.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (थकज) मते, 2030 पर्यंत, 500 दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये श्रवणक्षमता कमी होण्याची शक्यता आहे यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. श्रवणशक्ती कमी होणे यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. दिर्घकाळासाठी मोठ्या आवाजात वावरणे, कानाचे पडदे फाटणे, संसर्ग, कानात मेण जमा होणे, अनुवांशिकता, वृद्धत्व तसेच ओटोस्क्लेरोसिस, मधल्या कानाचा आजार आणि डोक्याला दुखापत यासारख्या काही वैद्यकीय परिस्थितींचा समावेश आहे. परंतु लहान वयातील बहिरेपणा हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. मेडिकवर हॉस्पिटल प्रतिबंधात्मक उपाय आणि सहभागासाठी कॉक्लियर इम्प्लांट आणि प्रगत ऑडिओलॉजी केअर व आधुनिक उपचारांवर प्रकाश टाकण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.

 सल्लागार ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला सांगतात  की, 1000 पैकी अंदाजे 3 ते 6 मुले जन्मतःच बहिरेपणासारख्या समस्येने पिडीत असतात. यामुळे संवादात अडथळे निर्माण होऊन त्यांना संभाषण साधता न येणे,बोलणे न समजणे आणि दैनंदिन कामांमध्ये सहभागी होणे देखील कठीण होते. कालांतराने, यामुळे सामाजिक अलगाव निर्माण होऊ शकतो, कारण निराशेमुळे किंवा लज्जेमुळे अशा व्यक्ती संवादांपासून दूर जाऊ शकतात. ऐकू न येणारी मुले बोलायला शिकणार नाहीत आणि ते बहिरेपणाबरोबरच आणि मूक्याचेही शिकारी ठरतात. ते अपंग होतात आणि त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांना असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यांना शिकण्याच्या आणि कमाईच्या समान संधी मिळत नाहीत. वेळीच निदान आणि वैद्यकीय उपचार ही गुंतागुंत रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. जन्माच्या वेळी ओएई (ज-ए) चाचणी आणि गरज पडल्यास बेरा (इएठ-) चाचणी करुन श्रवण क्षमता तपासता येते आणि कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे पुढील उपचारांमध्ये याची मदत होते. डॉ. राजेंद्र वाघेला पुढे सांगतात की, आमचे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत उपचार पद्धतींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री आहे. नाविन्यपूर्ण ऑडिओलॉजिकल

मूल्यांकनांपासून ते अत्याधुनिक कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्रांपर्यंत, आम्ही रुग्णांच्या श्रवणदोषाच्या विविध स्तरांसाठी तयार केलेले उपचार पुरवितो. श्रवण प्रशिक्षण आणि स्पीच थेरपीसह आमचे व्यापक पुनर्वसन उपचार रुग्णांना श्रवण उपकरणांशी जुळवून घेण्यास, त्यांच्या संवाद क्षमतेवर आत्मविश्‍वास परत मिळविण्यास आणि संपुर्ण जीवन जगण्यास मदत करतात. शिवाय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजूंना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया मोफत पुरविली जाते. प्रत्येकाचे श्रवण आरोग्य चांगले रहावे यासाठी आम्ही जनजागृती करतो आणि उच्च-स्तरीय वैद्यकीय सेवा प्रदान करतो असे मेडिकवर  हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top