नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नाविकांच्या योग्यतेवरील निर्बंध शितल ; डी.जी.शिपिंगने अधिकृत आवश्यक ठिकाणी निर्देश सूचना नोंदवावे असे न्यायालयाच्या सूचना


दि. 2 4k समाचार
न्यायालयिन याचिकेवर सकारात्मक निर्णय …नाविक कामगार नेते गौरव पोरवाल
मुंबई :- नोवहन महानिर्देशनालयाच्या ३१/२०२५ या  नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार होंडूरास, पनामा वेलीज ,कुक आइलँड सहित अन्य देशाच्या प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या नागरिकांच्या गुणवत्ता व योग्यतेच्या  मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने या वर आक्षेप घेत त्यामध्ये अनेक अटी ,शर्ती लादल्याने नाविक क्षेत्राच्या नियमावलित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. 

यामुळे ग्लोबल सिफेअर्स युनियन ऑफ इंडिया च्या बैठकित माजी आमदार बाळाराम पाटील व युनियनचे नाविक क्षेत्रातील तज्ञ,अभ्यासक कामगार नेते गौरव पोरवाल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशातील नाविकांच्या रोजगारावर गदा निर्माण होत असल्याने  मा.कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज त्या याचिकेवर मा. कोर्टाने FOC ,CoC असलेल्या सर्व भारतीय सागरी कर्मचाऱ्यांच हित लक्षात घेता  सकारात्मक अश्या अनेक मार्गदर्शक सूचना केल्या असल्याचे समजते. ज्यात FOC, CoC असलेल्या सागरी कर्मचाऱ्यांवर या पुढे एक तर्फी असे कोणताही  निर्णय घेऊन सागर प्रवास बंदी  करणार नाही असे सांगितले. यात सागरी कर्मचारी सध्या जहाजावर  अधिकृतपणे कार्यरत आहेत, ते त्यांच्या करारानुसार काम सुरू ठेवू शकतात, यावर कोणतीही अडचण निर्बंध येणार नाही.


हा सकारात्मक निर्णय संपूर्ण सागरी समुदायासाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय असल्याने लाखो नाविकांच्या जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. आणि  यावर देशातील  समुद्री करिअरच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाचा पाठिंबा मिळाल्याने भविष्यात नक्कीच नाविकांच्या योग्यता व सुरक्षा संबंधित महत्वपूर्ण पाऊल उचलतील अशी अपेक्षा DG शिपिंग कडून केली जात आहे .या न्यायालयीन आनंदोत्सवात लढा देणाऱ्या नाविक क्षेत्रातील  विधितज्ञ ,कामगार, संघटना सदस्यांनी माननीय कोर्टाचे आभार मानत आदेशाचे स्वागत करत एकमेकांना तोंड गोड करून मिठाई वाटप केली. तसेच  रायगड कोकण युनियन च्या शिष्टमंडळाच्या वतीने
ग्लोबल सिफेअर्स युनियन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक कामगार नेते  माजी आमदार बाळाराम पाटील व युनियनचे नाविक क्षेत्रातील तज्ञ,अभ्यासक कामगार नेते गौरव पोरवाल यांचे सत्कार करण्याचे ठरविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top