पनवेल दि.०२ 4k समाचार संजय कदम(वार्ताहर): पारंपरिक पध्दतीने जासई येथील हॉटेल महाराष्ट्र हे स्वच्छ, ताजे,उत्तम खाद्यपदार्थ घरगुती पध्दतीने बनवत महाराष्ट्रीयन स्वाद देण्यात लोकप्रिय आहे. अनेक वर्षाची त्यांची ही महत्त्व पूर्ण परंपरा पाहता काही समाज कंटकांनी समाज माध्यमातून कथित विवादित आरोप प्रत्यारोपातुंन कुप्रसिद्धी देत हॉटेल महाराष्ट्र अधिक चर्चेत आणल्याचे दिसत होते. .परिणामी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीद वाक्या ला परत एकदा सत्य ठरवत अत्यंत संवेदनशील पणे या प्रकरणात उरण पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी जगाला पाहायला मिळाली.

हॉटेल महाराष्ट्र व्यवस्थापनावरील केलेले सर्व आरोप बनाव असल्याचे स्वतः परप्रांतीय व्यसनी प्रेमसिंग यादव या तक्रारदाराने पोलीस तपासात कबुली देत सांगितले व हॉटेल पॅराडाईज व्यवस्थापन निष्कलंक व जवाबदार म्हणून सत्य ठरले .आणि विवादित जातीय रंग देऊन विविध माध्यमातून जसाईकरांच्या गावाची प्रतिमा मल्लिन करणारा समाजकंटक पोलिसांच्या चौकशी समोर गुडघे टेकत अखेर शरण गेला . आणि असत्याचा पराजय व सत्याचा विजय झाला .

या प्रकरणी उरणकर व जासईकरांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत ,बेजबाबदार पणे वागणाऱ्या समाज कंटक, परप्रांतीयांचा माजोर पणा भविष्यात परत कधी मराठी माणसाच्या अस्तित्वावर ,उपजीवेकेवर गदा आणणारा नसावा यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वानुमते केली . तसेच जासई- उरण च्या ऐतिहासिक ठिकाणाची प्रतिमा मल्लिन केल्यास किंवा अफवा ,बनाव म्हणून सामाजिक तेढ निर्माण करत येथील शांतता ,एकता भंग केल्यास ,चुकीच्या पद्धतीने वागल्यास स्थानिक मराठी माणूस कदापी सहन करणार नाही असे ग्रामस्थांनी असंतोष व्यक्त करत सांगितले.

आता या संघर्षातुंन पुन्हा एकदा नव्या उमेदने सदैव खवैय्यांसाठी गजबजलेल हॉटेल महाराष्ट्र हे हॉटेल पॅराडाईज नावाने परत एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी तयार असून अनेक वर्षे येणाऱ्या शेकडो वाहतूकदारांच्या व उरण जासईकरांच्यासाठी नव नवीन खाद्यसंस्कृती नुसार स्वादिष्ट पर्वणी घेऊन येत असल्याचे
समाजसेवक,उद्योजक धिरज घरत मित्र परिवार व हॉटेल पॅराडाईज व्यवस्थापनाने प्रसार माध्यमातून सांगितले. “अन्नदाता सुखी भव ” म्हणून आग्रहाने ग्राहकांनी आपली सेवा करण्याची पून्हा संधी द्यावी, भेटीसाठी यावे अशी विनंती करत. आपला प्रेम, विश्वास व साथ अशीच सदैव राहू दे म्हणून अपेक्षा व विनंती केली.
