नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

जनजागृतीचा अभाव असल्याचे सांगत संतोष काटे यांनी केली खंत व्यक्त.

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )
उलवे शहरातील व आजू बाजूच्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदार जागृतीची तीव्र गरज भासत आहे. काही भागांमध्ये खऱ्या मतदाराला मतदान करता न आल्याच्या तक्रारी सतत पुढे येत असून, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.उलवे शहरात व आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाले आहे.मतदान संदर्भात नागरिकांना योग्य वेळी योग्य माहिती, योग्य मदत मिळत नाही. जनजागृती पाहिजे तशी होत नाही त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान पासून वंचित राहावे लागल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी  खंत व्यक्त.
केली आहे.

यासाठी शासनाने त्वरित विविध उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा. मात्र उलवे भागातील काही परिसरात नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत, तर काहींनी मतदान केंद्रांची माहिती न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे.
मतदारांची मागणी:-
स्थानिक रहिवाशांचा ठाम आग्रह आहे की, “खऱ्या मतदाराला त्याचे मतदान करता आले पाहिजे.” कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा यंत्रणात्मक अडथळा मतदाराच्या अधिकाराला बाधा ठरतो आणि त्यामुळे लोकशाहीची मूळ भावना धुसर होते.

आयोगाकडून जनजागृती हवी:-
निवडणूक आयोगाने उलवे परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यामध्ये मतदार यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रांची माहिती, आणि मतदानाच्या तारखेबद्दल स्पष्ट मार्गदर्शन असावे.
स्थानिक संस्था पुढे याव्यात:-
स्थानिक सामाजिक संस्था, नागरीक मंडळे आणि शाळा–महाविद्यालयांनी मतदार जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम घ्यावेत. युवकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि सर्वांनी मिळून ‘एक मत, लोकशाहीसाठी एक पाऊल’ या भावनेने पुढे यावे.



संपर्क केंद्रांची स्थापना:-
प्रत्येक प्रभागात मदत कक्ष उभारून तिथे नागरिकांना मार्गदर्शन देण्यात यावे. तसेच मतदार ओळखपत्र, नाव नोंदणी किंवा तक्रारींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा विश्वास वाढेल.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी व्यक्त केले आहे.मतदार, जागे व्हा – तुमचं एक मत बदल घडवू शकतं! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी  खंत व्यक्त. केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top