नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन



4kNews कामोठे दि 6

पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त)  शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन
(६० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग; विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी ५०००+ हून अधिक रोजगाराच्या संधी)



पनवेल: पनवेलचे लोकप्रिय आमदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त), न्यू पनवेल येथील ‘प्लेसमेंट सेल’तर्फे भव्य ‘मेगा जॉब फेअर २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या परंपरेनुसार, हा भव्य रोजगार मेळावा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, खांदा कॉलनी, न्यू पनवेल कॅम्पसमध्ये पार पडणार आहे.



या वर्षीच्या मेगा जॉब फेअरमध्ये बैंकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल्स, इंजिनिअरिंग आणि सर्व्हिस क्षेत्रातील ६० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. यामध्ये एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, लिशिअस, आयडीबीआय इनटेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, क्वेस्ट कॉर्प, ओव्हन्स कॉर्निंग, टाटा एआयए, झेप्टो, सदरलँड, मुथूट फायनान्स आणि व्ही-एन्शुअर यांसारख्या अनेक आघाडीच्या कंपन्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती करणार आहेत.



हा रोजगार मेळावा सर्व स्तरांतील उमेदवारांसाठी खुला असून खालील शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यामध्ये सहभागी होऊ शकतात:
शालेय व व्यावसायिक शिक्षण: १० वी उत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा (Diploma) धारक तसेच कुशल व अकुशल उमेदवार.
पदवी व पदव्युत्तर शिक्षण: कला (B.A./M.A.), वाणिज्य (B.Com/M.Com), विज्ञान (B.Sc./M.Sc.), मॅनेजमेंट (BMS/BBA/MBA), इंजिनिअरिंग (B.E./B.Tech), विधी/कायदा (LLB/LLM) आणि इंटिरिअर डिझायनिंग.
“सर्व पदवीधर, डिप्लोमा धारक, १०वी/१२वी उत्तीर्ण व विविध शाखांमधील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी केले. 



मेळाव्याचा तपशील व नोंदणी माहिती
कार्यक्रम: मेगा जॉब फेअर २०२६
दिनांक व वेळ: शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ | सकाळी ९:०० वाजल्यापासून
स्थळ: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त), प्लॉट क्र. ०१, सेक्टर-११, खांदा कॉलनी, न्यू पनवेल (पश्चिम)
प्रवेश व नोंदणी शुल्क: पूर्णपणे मोफत
नोंदणी कशी करावी: जाहीर पत्रकावरील QR कोड स्कॅन करून उमेदवारांना मोफत नोंदणी करता येईल. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सोबत बायोडाटा (Resume/CV) च्या ९ ते १० प्रती सोबत आणाव्यात.




                                                                                                                                       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top