नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

सीकेटी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने उमरोली येथे भव्य वृक्षारोपण


4k समाचार दि. 14

पनवेल (प्रतिनिधी)  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (अधिकारप्रदत्त स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उमरोली येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासमयी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, स्वयंसेवक आदींची उपस्थिती लाभली.    



  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सूरु केलेल्या “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या निर्देशानुसार सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे “एक स्वयंसेवक एक झाड” या विस्तार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमदिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तथा कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या चमुने सकाळी ०८.३० वाजता उपक्रमस्थळाकरीता महाविद्यालयातुन प्रस्थान केले. सदर चमूचे ग्रामपंचायत उमरोलीचे सदस्यगण आणि कर्मचाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीच्या सरपंच  बेबी कचींद्र ठाकूर व उपसरपंच किरण डांगरकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्वेता हनुमान माळी, शुभांगी नरेश मढवी, उमरोली ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य, जय हनुमान क्रिकेट संघ उमरोलीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित विद्यार्थी, स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांनी वेगवेगळ्या प्रकाराच्या एकूण ३०० रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.       



 वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. संजय पाटील व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक  प्रो. (डॉ.) बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अध्यक्ष डॉ.  राजेश येवले, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. आलोक भानुशाली, प्रा. सुशिलकुमार घाडगे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भोईर, एन.एस.एस. अभ्यासक्रम समन्वयक प्रा. रुपेश माने, श्री. मिलिंद पाटील आणि सर्व  स्वयंसेवक-स्वयंसेविका  यांनी परिश्रमपूर्वक सहभाग घेतला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top