4k समाचार
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करणार्या विस्टा प्रोसेसेड फुडस्ने रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी घनदाट जंगल व यांना 10 लाखाचा सीएसआर फंड जाहीर केला आहे.

पनवेल कर नागरिकांच्या लोकसहभागा द्वारे पनवेल शहराच्या मध्यभागी पनवेल महानगर पालिका व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या घनदाट जंगल प्रकल्पास आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा तिसरा वर्धापन मान्यवरांच्या हस्ते केक कापून उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी करून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे विशेष कौतुक केले. सदर प्रसंगी सदर प्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विस्टा फुडस्चे व्यवस्थापकीय संचालक भुपेंदर सिंग, सल्लागार चंद्रशेखर सोमण, रो.डॉ.गिरीश गुणे, माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त विधाते, उपायुक्ता रुपाली माने, रोटरी प्रांत 3131 चे प्रांतपाल रो. संतोष मराठे, पुढील वर्षाचे प्रांतपाल रो. नितीन ढमाले, नियोजित प्रांतपाल रो. चारू श्रोत्री, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी महापौर डॉ. कविता चौतमल, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, बबनदादा पाटील, वाय टी देशमुख, रामदास शेवाळे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगर सेवक रमेश गुडेकर, गणेश कडू, नितीनभाई पाटील, जयंत पगडे, रुचिता लोंढे समेळ, डॉ.सुरेखा मोहोकर, सारिका भगत, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट चे सदस्य दिवाकर ठोंबरे,

पनवेल शहर भाजप अध्यक्ष सुमित झुंझारराव,रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष अनिल ठकेकर, सचिव अतिश थोरात, प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड यांचे सह सर्व रोटरी सदस्य, एन्स व पनवेल चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रो.गिरीश गुणे यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या प्रत्येक महत्वाकांक्षी प्रकल्पाला विस्टा प्रोसेसेड फुडसचा नेहमीच मदतीचा हात असतो. मागील वेळी सुद्धा त्यांनी भरघोस मदत केली होती. यावेळी सुद्धा 10 लाखाचा धनादेश त्यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून देण्याचे मान्य केले आहे. याबदद्दल मी रोटरीच्या वतीने आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
