नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे, महावीर इंटरनॅशनल आणि रुधीर सेतू संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन



4kNews कामोठे दि. 6

सीकेटी महाविद्यालयात सोमवार दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी एनसीसी विभागातर्फे, महावीर इंटरनॅशनल आणि रुधीर सेतू संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १३६ एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. शिबिरादरम्यान सर्व कॅडेट्सची वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखरेची पातळी (Sugar), संपूर्ण रक्तपेशी मोजणी (Complete Blood Count – CBC) यांसह इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कॅडेट्सनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमात आपला मोलाचा सहभाग नोंदविला.



रक्तदान शिबिराचे आयोजन अनुभवी वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणी आणि सामाजिक सेवेमध्ये युवकांची भूमिका याविषयी कॅडेट्सना मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, एनसीसी अधिकारी डॉ. नीलिमा तिदार  आणि उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत, युवकांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. हा उपक्रम “एकता आणि शिस्त” या एनसीसीच्या ब्रीदवाक्याला साजेसा ठरत समाजसेवेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.



सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने, महावीर इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पोदार तसेच रुधिर सेतू संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश रिसबुड यांचे या रक्तदान शिबिरासाठी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार प्रकट केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top