4kNews कामोठे दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलचे शिवसेना उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने १ नोव्हेंबर रोजी २०० जीवनावश्यक वस्तूंचे किट बहिरेवाडी येथे रवाना करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. या किटमध्ये तांदूळ, साखर, तेल, मूगडाळ, चणाडाळ, साबण, चहा, वाटाणा डाळ आणि पीठ आदी वस्तूंचा समावेश आहे.
राहुल गोगटे यांच्याकडून यापूर्वीही पूरग्रस्तांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व छत्र्यांचे वाटप, कोकणातील गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, नगरसेवक तथा महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रसंगी शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजित साखरे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, सुजन मुसलोंडकर, सुनील खळदे आदी उपस्थित होते.

