नवीन बातम्या
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*
रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव 
सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार
पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्तीपनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती
पनवेलसाठी सिडकोने पाणी उपलब्ध करून द्यावे
खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार

पनवेलकरांना उत्कंठा  ‘असंभव’ च्या निमित्ताने अनेक मातब्बर एकत्र; दमदार, अनुभवी  कलाकार, तंत्रज्ञ यांनी साकारली सर्वोत्कृष्ट कलाकृती

4k समाचार 
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे  ‘असंभव’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांची अभिनयातील प्रगल्भता आणि विविध भूमिकांचा अनुभव यामुळे या चित्रपटात काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार असल्याचा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत. ‘असंभव’मध्ये कलाकारांइतकीच ताकद निर्मिती विभागातही आहे. अनुभवी निर्माते, सहनिर्माते एकत्र आल्याने हा प्रकल्प भक्कम पाया घेऊन उभा राहिला आहे. सदर चित्रपठ हा येत्या रविवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पनवेल येथील ओरायन मॉल येथे असलेल्या पीव्हीआर मध्ये मोठ्या थाटात पदर्शित होत असून त्याची  उत्कंठा  पनवेलकरांना लागली आहे . 

   अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर ‘असंभव’च्या निमित्ताने पहिल्यांदाच पूर्णपणे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणारे सचित पाटील. पहिल्याच निर्मितीसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड केली आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत अनुभवी नाव म्हणजे नितीन वैद्य.चाळीसहून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केलेल्या नितीन वैद्य यांना चित्रपट निर्मितीची उत्तम जाण आहे. बांधकाम उद्योगातील विश्वासार्ह आणि नावाजलेलं नाव मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांसारखे भक्कम सहनिर्माते ‘असंभव’ला लाभल्यामुळे या चित्रपटाची उंची अधिकच वाढली आहे. याशिवाय सहनिर्मितीत शर्मिष्ठा राऊत, आणि तेजस देसाई ज्यांनी अनेक मालिका आणि चित्रपट निर्मिती करून स्वतःला सिद्ध केलं आहे.अशा दमदार सहनिर्मात्यांचाही या चित्रपटात सहभाग आहे. हे सगळे निर्माते एकत्र येऊन,  प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त कलाकृती घेऊन येत आहे.’असंभव’ची कथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून पटकथा कपिल भोपटकर, विशाल इनामदार आणि सचित पाटील यांनी लिहिली आहे. 

तर या तिघांच्या लेखनकौशल्याने कथानकाला थरार, भावना आणि वळण मिळाले आहे. एकंदरच प्रत्येक विभागाने आपलं सर्वोत्तम दिल्याने ‘असंभव’ हा कधी न पाहिलेला, भव्य आणि उच्च निर्मितीमूल्य असलेला चित्रपट बनला आहे.या सहयोगाबद्दल निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता सचित पाटील म्हणतात, ” दर्जेदार, अनुभवी कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ एकत्र आल्यामुळेच ही चांगली कलाकृती घडू शकली. हा चित्रपट भव्य होण्यास या सगळ्याचाच हातभार लाभला आहे.”,सहनिर्माते मंगेश परुळेकर म्हणतात, ” या चित्रपटाचा भाग होणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. चित्रपटाची टीम अप्रतिम आहे. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे म्हटले तरी चालेल.” तर सहनिर्माते संजय पोतदार म्हणतात, ”प्रतिभावान कलाकार, सर्वोत्तम निर्माती टीम आणि अनुभवी तंत्रज्ञ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अनोखा आहे.” ‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top