नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शब्दांची मैफिल मनाला नवीन ऊर्जा देते – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेलमध्ये साहित्यिकांचा सत्कार आणि कवी संमेलन संपन्न


4k समाचार दि. 19
पनवेल (प्रतिनिधी) हृदयातील भावना म्हणजे साहित्य,कवी-साहित्यिक लिहितात ते खऱ्या अर्थाने हृदयाला भिडत. आयुष्याच्या धकाधकीत मनाला समाधान वाटत असेल तर साहित्यिक कार्यक्रमाला जावे,कवी संमेलनातील शब्दांची मैफिल ही मनाला नवीन ऊर्जा देते असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे काढले.श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कवी संमेलन समारंभ प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. या सोहळ्यास सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख,भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, माजी उपमहापौर व जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके उपस्थित होते. 


कोमसाप पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष रोहिदास पोटे यांच्या गझलगंधाक्षरी ग्रंथाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रभाकर पाटे स्मृती समीक्षा पुरस्कार,नवीन पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मढवी यांनाही उधळ्या कांदबरीला वि.वा.हडप स्मृती विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल,नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांची केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल व शाखेच्या सदस्या योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची राज्य शासनाच्या वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर तालुकास्तरीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आणि खोपोली शाखेचे सदस्य डॉ.सुभाष कटकधौंड यांच्या पुन्हा एकदा नव्याने जगायचे मला या एकांकीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रथम क्रमांकाचा रमेश किर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


  यावेळी बोलताना सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे म्हणाले ज्या पद्धतीने आजच्या कवी संमेलनामध्ये कविता सादर होतात,अशा सुंदर कवितांमुळे कवींमध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे.कविता लिहितो,त्यात शब्द असे हवेत की भरून आलं पाहिजे. आपलं जगणं पण गाणं झालं पाहिजे.जगण्याचे गाणे व्हावे ते गाणे सुंदर व्हावे.रामशेठ ठाकूर यांच्यात साहित्याचा अनुबंध राहिला आहे कारण ते शिक्षक होते. मराठीच्या सगळ्या पाठावर पनवेलचे नाव साहित्यिक म्हणून घेतले जाईल असे सांगून पनवेलची सांस्कृतिक जबाबदारी लोकनेते रामशेठ ठाकूर या नावाच्या शिक्षकांनी घेतली आहे. एखादं गाव एखाद्या साहित्यिकाचे कौतुक करतो हा साहित्यिकाचा सन्मानच आहे असे शेवटी सांगितले.
ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी, साहित्यिकांचे गाव असा पनवेलचा नावलौकिक साहित्यिक वर्तुळात घेतलं गेलं पाहिजे.साहित्य लिहा, पनवेलचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ कवी अश्व नायगावकर यांचेही भाषण झाले.


    यावेळी कविसंमेलन रंगले.सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांच्यासह उपस्थित कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले. सामाजिक वास्तव,मानवी नात्यांची उब, निसर्ग, प्रेम,अनुभवांचे रंग आणि भावविश्वाचे विविध पैलू कवितांमधून खुलून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले.उपस्थितांचे आभार कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रज्ञा जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top