नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

सीकेटीच्या अवधूत नाईकची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड सीकेटी विद्यालयाचा अभिमान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन


4k समाचार दि. 19
पनवेल (प्रतिनिधी) क्रीडा व युवक संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य आणि मुंबई उपनगर क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमेया क्लासिक क्लब यशवंत नगर विरार येथे झालेल्या मुंबई विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक (सी के टी) विद्यालयातील इयत्ता बारावीतील अवधूत सागर नाईक या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.      

  अवधूत नाईकने स्पर्धेत दाखवलेल्या कौशल्यपूर्ण खेळी, गती आणि धैर्याची परीक्षकांनी दखल घेत त्याला विजेतेपद बहाल केले. कठोर मेहनत, सततचा सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले असून, राज्य पातळीवरही तो असाच दमदार प्रदर्शन करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अवधूतच्या या चमकदार कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, क्रीडा शिक्षक अरुण पाटील, मनोज पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top