नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात  ४२२ स्पर्धकांचा सहभाग  सीकेटी महाविद्यालयात १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा


4 समाचार दि 19
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण सुरुवात झाली. २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील तब्बल ४२२ स्पर्धक सहभागी झाले आहेत.



स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी संचालक आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच मुंबई शहर झोन-१ चे उपाध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थित खेळाडूंचे मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळभावना जपून स्पर्धा खेळण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला मुंबई शहर झोन-१ सचिव डॉ. मनोज वर्मा, मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक, मुंबई उपनगर सचिव डॉ. निलम पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या आयोजनाचे कौतुक करत स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईत खेळ संस्कृती अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर, प्रा. प्रतिज्ञा पाटील यांच्यासह जिमखाना विभागातील सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. स्पर्धेत विविध वयोगटातील आणि वजनगटातील सामने सलगपणे पार पडत असून खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.सीकेटी महाविद्यालयात दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बॉक्सिंग स्पर्धा ही विशेष उत्साहाने पार पडणारी स्पर्धा असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top