नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात


4k News कामोठे
उरण, दि. 28  (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे आणि सागरी विकास मंच, राऊंड फॉरेस्ट कांदळवन, उरण वन विभाग व लायन्स क्लब वीर वाजेकर कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने नागाव-पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ५०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.



महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र दल (NCC) यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात यू.ई.एस. कॉलेज, केडीएस कॉलेज, उरण तसेच काळसेकर कॉलेज, पनवेल येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी समुद्रकिनारे हे पर्यावरणीय समतोल व सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगत, ‘आपला सागरकिनारा, आपली जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.



पर्यटकांनी कचरा समुद्रकिनारी न टाकता कचराकुंड्यांचा वापर करावा, यासाठी ठिकठिकाणी कचराकुंड्या व जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले. विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचरा संकलित केला.
ग्रेंडवेल कंपनी, हितेश शहा व कौशिक शहा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना हातमोजे, मास्क, पिण्याचे पाणी व अल्पोपहार देण्यात आला. नागाव व म्हातवली ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाडी उपलब्ध करून दिली.



यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी, सागरी विकास मंचाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसुधारणा मंडळाचे सदस्य तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संदीप घोडके, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोहीम यशस्वी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top