नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.

बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते.

पहिल्या फेरीत बाळाराम पाटील यांनी ३ हजार ६१२ मतांनी आघाडी घेतल्याने बाळाराम पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होती. बाळाराम पाटील यांची ही आघाडी पाच फेऱ्या पर्यंत टिकवण्यात त्यांना यश मिळाले. दुसऱ्या फेरीत ७ हजार ८३६ मताची त्यांनी आघाडी मिळवली, तिसऱ्या फेरीत बाळाराम पाटील यांची ही आघाडी काहीशी कमी होताना दिसून आली. तिसऱ्या फेरीत त्यांनी ६,२३१ मतांची आघाडी मिळवली त्या नंतर चौथ्या फेरीत त्यांनी पुन्हा ६ हजार ९७१ मताची आघाडी घेत आघाडी कायम ठेवली आहे. मात्र ही आघाडी पाचव्या फेरीत ६५४ वर आली.


  माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती. पनवेल मधील अनेक समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. अर्धवट केलेली विकास कामे, नैना प्रश्न, मालमत्ता कर यावर लक्ष दिले. मात्र बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला. हार न मानता आपल्यावर ज्या 1 लाख 32  हजार 840 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्याच सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन बाळाराम पाटील यांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top