नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महाविकास आघाडीच्या मोर्च्याला आले यश.. 

4k समाचार दि. 28
कामोठे मधील सेक्टर १७,१८,१९ चा पाणी प्रश्न सुटणार
ऐन दिवाळीत अभ्यंग स्नानाच्या दिवशी कामोठे मध्ये पाणी संकट उभे राहिले. सेक्टर १७,१८,१९,२२,२३,२४ मध्ये अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे अनेकांनी दिवाळीची आंघॊळ देखील केली नाही त्यावेळी महाविकास आघाडी कामोठेच्या वतीने मा. आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वा खाली रहिवाशी आणि कार्यकर्त्यांनी कामोठे पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या मांडला. शेवटी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सेक्टर १७,१८ व १९ मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकू असे लेखी आश्वासन दिले होते. 

आणि २३ ऑक्टोबर पर्यत पाईप टाकण्यात येईल असे कळवण्यात आले होते.  मात्र तारीख उलटून गेली तरी पाईप न आल्याने सोमवारी (२७ ऑक्टोबर) रोजी पाणी पुरवठा कार्यालयाला टाळा लावणार होते मात्र महाविकास आघाडीच्या दणक्याने अखेर सिडको नेमली आणि २५ ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे पाण्याचे पाईप आणले. काही दिवसातच या पाईपातून नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होईल अशी भावना शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली.


सदर काम पाहण्यासाठी मा. नगरसेवक प्रमोद भगत, सखाराम पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, विश्वास भगत, शिवसेना (उबाठा) प्रभाकर गोवारी, गणेश खांडगे, रुपाली धिवार, एकनाथ गोवारी,अक्षय नवसकर, बापू साळुंखे, शेकाप कुणाल भेंडे, रमेश गोरे, काँग्रेसचे डॉ. धनंजय क्षीरसागर, सूर्यवंशी, सुनील जाधव, सोनू जाधव, दत्ताराम पेडणेकर तसेच रहिवाशी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top