नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
WordCamp Central: A Shoutout to Meahadi Hasan: From the Classroom to the Global WordPress Community

खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य

4kNews कामोठे दि. 6
खारघर (प्रतिनिधी) : खारघरवासीयांच्या आग्रहास्तव आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, खारघर यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी ‘दिवाळी संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आपल्या सुमधुर आवाजातून लोकप्रिय गीतांची सुरेल मैफल सादर करणार आहेत.



शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सेक्टर १२ येथील गावदेवी मैदान, खारघर येथे हा कार्यक्रम होणार आहे. दिवाळीनिमित्त आयोजित या संगीत मैफलीसाठी प्रवेश विनामूल्य असून, खारघरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन खारघर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



अधिक माहितीसाठी दीपक शिंदे (९९३०२९१८१४), दीपक ठाकूर (७७३८२८००२२), आयुष घरत (८४३३८६३२३९) किंवा साधना पवार (७०२१५०१००८) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top