एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी


4kNews कामोठे दि. 11
पनवेल / :प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर तसेच आरोग्य संवर्धनास घातक असणाऱ्या वस्तूंची शाळांच्या परिसरात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाचे स्पष्ट निर्बंध आणि बंदी असतानाही पळस्पे ग्रामपंचायत हद्दिती एमएनआर  इंटरनॅशनल  शाळेच्या बाजूलाच सर्रासपणे अशी विक्री होत असताना  दिसत  आहे   प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अवैध व्यवसाय फोफावला असून, संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची तीव्र मागणी पालकांकडून व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, अंमली पदार्थ तसेच निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकण्यावर कायदेशीर बंदी आहे. असे असतानाही अनेक शाळांच्या बाहेर असणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांमध्ये हे घातक पदार्थ उघडपणे विकले जात आहेत. लहान मुले व तरुण पिढी या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.तसेच  नागरिकांच्या आरोग्यास घातक पदार्थ शाळेच्या बाजूलाच विक्री होत असल्याने त्यावर ताटाकल बंदी आणावी अशी मागणी होऊ लागली आहे 


याशिवाय उघड्यावर विकले जाणारे अस्वच्छ, भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि पेयांमुळे नागरिकांच्या ,विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पोलिसांचे गस्त पथक आणि अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कोणतीही नियमित तपासणी होत नसल्याने या विक्रेत्यांचे धाडस वाढले आहे.
प्रशासनाने या बाबीची तातडीने दखल घेऊन एम एन आर इंटरनॅशनल  शाळा परिसरातील या अवैध धंद्यांवर व घातक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी,  सर्व्हिस  रोड वर अतिक्रमण करून उभारलेल्या या टपऱ्या ,दुकानांवर कारवाई करून ते अतिक्रमण  रस्ते मुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top