4kNews कामोठे दि. 9
११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सवाचे आयोजन; श्रावणी महाजन यांच्या सादरीकरणासह लाईव्ह बँडचे आकर्षण
खारघर (वार्ताहर) : भारतीय जनता पार्टी प्रणित मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे ‘खारघरची आई – नमो गरबा २०२६’ या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान जेएचबीसी मैदानावर, डीमार्टसमोर आणि खारघर गाव मेट्रो स्टेशनजवळ हा उत्सव रंगणार आहे.

उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ फेम श्रावणी महाजन यांचे सादरीकरण आणि लाईव्ह बँड. तसेच ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘खारघरची आई’चा भव्य आगमन सोहळा होणार आहे. यावेळी ‘एकविरा म्युझिकल ग्रुप – मी बेलापूरकर’ आणि ‘श्री दैवत ढोल-ताशा व ध्वजपथका’चे सादरीकरण होणार आहे.
पहिल्याच वर्षी आयोजित या उत्सवाच्या माध्यमातून भक्ती, परंपरा आणि गरब्याचा आनंद नागरिकांना अनुभवता येणार आहे. खारघर तसेच नवी मुंबईतील नागरिकांनी कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाची तिकिटे BookMyShow वर उपलब्ध आहेत.

या उत्सवाचे आयोजन मधु पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु पाटील आणि प्रविण पाटील वेल्फेअर असोसिएशनचे प्रविण पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

