4k समाचार
पुणे, दि. 15 – पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतीचे बांध तुटले असून ओढे-तळे तुडुंब भरून पाणी सांडव्यावरून वाहत आहे.

शेत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खाडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात १४,५०० क्युसेक्स इतक्या विसर्गाला सुरुवात करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
