4k समाचार दि. 15
नवी मुंबई – हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर येथून उल गुलाल आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो आदिवासी बांधव त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची पुढील टप्पा मंत्रालयापर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष लकीव जाधव यांनी हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला व इतर हक्कांना धोका निर्माण होत असल्याचा दावा करत प्रशासनाने यावर तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. आंदोलनाद्वारे आदिवासी समाजाच्या अस्तित्व आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जोरदार आवाज उठवला जात आहे.
