पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ चे भव्य कार्यक्रम बुधवार दिनांक २९ जानेवारीला सायंकाळी ०४ वाजता होणार आहे. या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथीम्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे व समीर ठाकूर यांची उपस्थिती सोहळ्याला लाभणार आहे .

सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या सत्रात दर्पण २०२४-२५ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी महापौर चारुशीला घरत, माजी उपमहापौर सीता पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रकाश भगत व हरिभाऊ पाटील, विनायक कोळी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे व राजश्री वावेकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे .त्याचबरोबर चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील, कलाशाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्यशाखेचे प्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञानशाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन.वाजेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन , सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन, आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण २०२४-२५ हा कार्यक्रम साजरा होणार आहे.
