नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

4 समाचार  
पनवेल ता.15 ( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. 


या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रवेशावेळी उपस्थित शिवसैनिकांनी नवागत कार्यकर्त्यांचे उत्साहाने स्वागत केले. 


या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, “कळंबोलीत शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची साथ मिळणे ही संघटनेसाठी सकारात्मक बाब आहे. तुषार जाधव, महादेव एरोळे यांच्यासह ऋतिक कुंभार, प्रशांत पाटील, पियुष तिवारी, अब्दुल शेख, विशाल बोराडे  यांनी प्रवेश केला
कार्यक्रमाला विभाग प्रमुख निलेश दिसले रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, आनंद माने सरकार, विशाल सपकाळ, नारायण पिलाने, सुधीर ठोंबरे, प्रेम गोडसे यांच्यासह  अनेक शिवसैनिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top