4k समाचार
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील अजिवली येथे राहणारे कृष्णा चव्हाण यांच्या ट्रान्सपोर्टची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र.एमएच-46-सीयु-7123 ही 10 लाख रुपये किंमतीची गाडी चोरीस गेल्याप्रकरणी तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

यावेळी वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, सपोनि अनिरुद्ध गिजे, पोउपनि हर्षल राजपूत, सुभाष डिघे, पो.हवा. धुमाळ, तांडेल, कुदळे, बाबर, देवरे, म्हारसे, पो.शि. भगत, खताळ आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक शोध घेतला असता गाडीवरील चालक निखील उर्फ काळू जाधव (25) याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता

त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असून त्यास सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तसेच फलटण पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे तर त्याचा सहकारी हरी चव्हाण याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहे
