पनवेल दि. २२ ( संजय कदम ) : एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
अनोळखी पुरुष ( आझाद ) अदाजे वय 47 वर्षे, उची-5फूट 6 इच, रंग सावळा चेहरा-उभट असे वर्णन असून मयत अनोळखी इसम हा जागृती रिहॅबलिटेशन सेंटर प्लॉट में 6 सेक्टर-11, तळोजा फाटा ता. पनवेल याठिकाणी भोवळ येवून पडले म्हणून त्याना उपचाराकामी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल या ठिकाणी व त्यानतर प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे व तेथून सायन हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान कर्तव्यावरील डॉक्टरांनी मयत घोषित केले. सदर इसमाच्या नातेवाईकाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने तळोजा पोलीस ठाणे किंवा पो. उप. नि. अजयकुमार मोहिते यांच्याशी संपर्क साधावा .
