उरण, दि. २२ (विठ्ठल ममताबादे) :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित “पाककला स्पर्धा २०२५” महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्साहात साजरी केली.

या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या स्पर्धेमधून साध्य झाला. एकूण ४३ महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत सादर केलेले शेवग्याचे पकोडे, चिंबो-या लालिपॉप, केशर फालुदा, चिकन, तांदळाची खीर आदी पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण पदार्थ सर्वांची मने जिंकून गेले.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रतिमाताई जाधव, कुंदा ठाकुर, सुमिता तुपेकर, सुलोचना पाटील, भारती कटेकर, उज्ज्वला ठाकुर, सुगंधाताई कडू आदींचा समावेश होता. सुत्रसंचालन श्याम ठाकूर यांनी केले आणि परीक्षक म्हणून प्रितिमाताई जाधव यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक महिला पुढीलप्रमाणे :
🏆 प्रथम क्रमांक – सौ. स्नेहा नितीन ठाकुर (चिरनेर)
🥈 द्वितीय क्रमांक – सौ. राणी सागर ठाकुर (धुतूम)
🥉 तृतीय क्रमांक – सौ. प्रणाली प्रविण घरत (धुतूम)
🎖️ उत्तेजनार्थ – सौ. अर्पिता जोशी, सौ. ज्योती म्हात्रे, सौ. अश्विनी ठाकुर

पाककला स्पर्धेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच उद्योजकतेला चालना मिळेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक पार पाडले.
