नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष; कोपरा, मुर्बी व खारघर येथील उत्कृष्ट २४ विद्यार्थ्यांचा गौरव

4kNews दि. 10

पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी सादर करत एकूण २४ विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले, तसेच या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 



विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, माझे स्वप्न, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त भारत, डिजिटल युगातील विद्यार्थी, जर मी नेता असतो अशा विषयांवर प्रभावी, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या विचारांची खोली व भाषणकलेची रचना पाहून उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाच्या व्यासपीठावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी अभिमानाचे ठरले. 



स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले कि, “कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील रा. जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलांना आत्मविश्वास वाढवण्यास आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते.तर मुख्याध्यापिका अनिता शेळके यांनी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना नमूद केले. आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची भाषणकला, नेतृत्वगुण आणि विचारशक्ती विकसित होते. कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली आहे. या उपक्रमामुळे रायगड जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा खारघर महासचिव दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, उत्तर रायगड सचिव ब्रिजेश पटेल, खारघर उपाध्यक्ष किरण पाटील, अजित अडसुळे, सुरेश ठाकूर, दत्ता ठाकूर, अजय माळी, अश्विनी भुवड, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, सचिव आदित्य हाटगे, योगेश पाटील, मयूर घरत, यश पवार, अनिकेत पाटील, बंटी ढाकसे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top